पाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार

Tuesday, 12 June 2018 09:57 Written by  Published in चंद्रपूर Read 277 times

पाँलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि  बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

           पाँलिटेक्निकच्या अंतिम सत्राच्या निकाल जाहीर होताच यात उत्तीर्ण  झालेल्या भावी अभियांत्रिकांना पुढील अभियांत्रिकी शिक्षणासाठी टी.सी. व मार्कशीट चि अत्यंत आवश्यक्यता आहे. परंतु शासन व महाविध्यालयाच्या भोंगळ  कारभाळामुळे शिष्यवृत्तीचे कारण समोर करून या विध्यार्थ्यांच्या टी.सी. व मार्क लिस्ट अडकवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जर येत्या १५ दिवसात या विध्यार्थ्यांना टी.सी. व मार्कशीट देण्यात आले नाही तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सरकार व शैक्षणिक  संस्थाच्या विरोधात विधार्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला आहे.  

Last modified on Friday, 06 July 2018 14:27
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.