धारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना

Tuesday, 12 June 2018 08:47 Written by  Published in चंद्रपूर Read 717 times

कार्यक्रमात झालेल्या वादातून 35 वर्षीय़़ ईसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जूनोना चौकात घडली. संतोश सिंह टाक असे या घटनेतील मृतकाचे नाव असून घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

 मिळालेल्या माहिती नूसार काल टाक कुटुंबीयांचा जूनोना चौकात वारात जेवनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोषचा त्यांच्याच नातलगांशी वाद झाला. हा वाद ईतका विकोपाला गेला कि. आरोपी युवकांनी धारदार शस्त्राने संतोषवर हल्ला चढविला. या हल्ल्यात संतोष गंभिर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा समान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Last modified on Friday, 21 September 2018 13:31
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.