‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा Featured

Tuesday, 12 June 2018 08:13 Written by  Published in चंद्रपूर Read 274 times

 कर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित शहीदाचा दर्जा देण्यात आला असून याठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.


९ जून १९९६ रोजी पोलीस हवालदार साधुजी चांदेकर हे आपल्या दुचाकीने चंद्रपूरकडे जुनोना मार्गे जात होते. यावेळी त्यांना गिलबिली गावाजवळ एका ट्रकमध्ये महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजावरुन चांदेकर यांनी आपले वाहन थांबविले. यावेळी ट्रकमध्ये पाहिले असता, त्यांना ट्रक चालक चारा शोधण्यासाठी आलेल्या महिलेचा छळ करीत असताना दृष्ट्रीस पडले. यावेळी चांदेकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, त्या महिलेची ट्रक चालकाच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान तिला सुखरूप तिच्या मार्गावर सोडले.
मात्र संतप्त झालेल्या ट्रकचालकाने साधुजी चांदेकर यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या त्यांच्या विरमरणाला शनिवारी राज्य आणि केंद्र शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना शहीदाचा दर्जा दिला. यावेळी त्यांच्या पत्नी अनीता चांदेकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) मारोती इंगवले, पोलीस निरिक्षक कोळी, पी. व्ही. मेश्राम उपस्थित होते.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.