शेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन Featured

Friday, 08 June 2018 11:51 Written by  Published in चंद्रपूर Read 46 times

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज  बिआरएसपीच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले 

 

 शेतकरी बांधव आजघडीला मोठ्या आर्थिक प्रपंचात भरडला जात आहे .कित्येक वर्षापासुन शेतकर्याच्या हक्काच्या जमीनीला या कांग्रेस, बिजेपी च्या सरकारने पट्टे देण्याचे नाकारले आहे.जबरान जोत शेतकरी आजघडीला माझी  जमीन जाईल या दहशती खाली  जगत आहे .हे शासन जबरान जोत शेतकर्यांची जमीन हिसकावन्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. तरी जबारनजोत शेकर्यांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे.राज्यातील शेतीविषयक धोरण ,सरसकट कर्ज माफी करावी,शेतपिकाला हमीभाव च्या दुपट भाव द्या,  बळीराजाला किमान वयाचे 60 वर्षानंतर मासिक 5000 रु पेंशन देण्यात य़ावे या मागण्यास इतर मागण्यासाठी बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांच्या नेत्रुत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. जर ह्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा तिव्र आंदोलन करण्याच्या ईशारा राजु झोडे यांनी यावेळी  दिला. या धरणे आंदोलनात संजय मगर बिआरव्हीएम विदर्भ संयोजक,संजय बोधे लोकसभाध्यक्ष चंद्रपूर,ईंजी.मोनलदादा भडके,अजय लिहीतकर,राजु रामटेके,महेंन्द्र झाडे,संजय वानखेडे,संपत कोरडे,रुषी पेटकुले,.संजय भडके,अमित नळे,मितवा पाटील,जिवने ,खोब्रागडे, चंद्रकांत माझी, अमोल बावने, शंकर आस्वले, चिन्ना गेडाम, विठल लोनबले, तसेच असंख्य कारकर्ते व शेतकरी उपस्थीत होते

Last modified on Friday, 08 June 2018 11:55
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.