टोपल्या विकून मुलाबाळांचा सांभाळ करत समजापुढे आदर्श ठेवना-या किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई यांचा ‘मातोश्री’ पुरस्काराने गौरव - पुणे येथे रंगला सत्कार सोहळा Featured

Friday, 08 June 2018 09:48 Written by  Published in चंद्रपूर Read 71 times

किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.             

 

         महिलांनी जेव्हा जेव्हा बंड पुकारला तेव्हा तेव्हा एक नवी क्रांती घडली हा या देशाचा इतिहास आहे. असाच एक परिस्थिती विरोधातील संघर्ष चंद्रपुरातील गंगुबाई जोरगेवार यांनी पतीच्या निधनानंतर आजपासून २५ वर्षापूर्वी सुरु केला विपरीत परिस्थिती असली तरी जिंकण्याचि जिद्द उराशी बाळगून टोपल्या विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरु केला. आणि यातून मिळेल त्या अल्प पैश्यातुन ३ मुली व २ मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या संघर्षाला आज मोठे फलित आले असून आज जिल्ह्यातील प्रतिष्ठीत घराणे म्हणून जोरगेवार घराणे समोर आले आहे. त्यांचा एक मुलगा किशोर जोरगेवार यांनी राजकारणात ठसा उमटवला असून त्यांची समाजासाठी मोठे कार्य सुरु आहे. तर लहान मुलगा हा उत्तम व्यावसायिक बनला आहे. गंगुबाई यांच्या या संघर्षाचे मोठे यश असून त्यांच्या या संघर्षाचि पावती म्हणून त्यांचा अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे ‘मातोश्री’ पुरस्कार देऊन पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे सुपुत्र किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, रंजिता जोरगेवार, कोमल जोरगेवार, कामिनी जोरगेवार, प्रसाद जोरगेवार यांची उपस्थिती होती. आज जोरगेवार घराण्याची परिस्थिती बदलली असली तरी ‘गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही’ या उक्ती प्रमाणे गंगुबाई आजही मनपा समोर फुटपाथ वर टोपल्या विक्रीचा व्यवसाय नित्य नियमाने करीत आहे हे विशेष........

 

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.