ताडोबात काळ्या बिबट्याचे पुन्हा झाले दर्शन... Featured

Friday, 08 June 2018 09:34 Written by  Published in चंद्रपूर Read 82 times

 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. यावरून सोशल मिडियावरही बराच खल झाला. ताडोबातील कॅमेऱ्यातही हा बिबट कैद झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा बिबट बुधवारी पुन्हा याच परिसरात श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले.


काळा बिबट हा दुर्मिळ असा प्राणी असून त्याच्या मायावी रुपामुळे त्याला जंगलातील भूत असेही संबोधले जात असते. त्याला बालगोपालांच्या भाषेत बघिरा असेही नामाभिधान दिले जाते.चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी प्रकल्पात २२ मे रोजी मंगळवारी कोळसा वन परिक्षेत्रात शिवणझरी पाणवठ्यापाशी हा काळा बिबट प्रथम आढळला होता. बेल्जियमचे पर्यटक जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट यांनी हा काळा बिबट सगळ्यात आधी पाहिला आणि त्याला कॅमेराबद्ध केलं होतं.

Last modified on Friday, 08 June 2018 09:46
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.