चंद्रपूर: 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्हîतील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

2104 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवून 51 हजार मत घेत सर्व राजकीय पक्षांना धक्का देणा-या किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय  वर्तुळात खळबळ माजली आहे. किशोर जोरगेवार हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा रंगल्या आहे.

 

४८ तास पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. या अंदाजा नुसार गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार सुरु आहे. त्यामुळे ठीकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील अणेक रस्ते सुद्धा बंद झाले आहे. त्यामूळे याचा मोठा त्रास विदयार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता उदया सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.

पाँलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि  बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कार्यक्रमात झालेल्या वादातून 35 वर्षीय़़ ईसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जूनोना चौकात घडली. संतोश सिंह टाक असे या घटनेतील मृतकाचे नाव असून घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.

 कर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित शहीदाचा दर्जा देण्यात आला असून याठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज  बिआरएसपीच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले 

चंद्रपूर : शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला गॅस वाटप योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शुध्द पाणी पुरवठयाची अमृत योजना, महानगरातील पाणी पुरवठयासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला. चंद्रपुरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा अधिक सक्रीय व योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Page 2 of 3