उपक्षेत्रीय प्रबंधक पैनगंगा मधील डब्लु सि एल कामगारांवर होणार्या अन्यायायाविरोधात त्यांच्या प्रमुख मांगण्याना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांनी सबंधीत विभागातील अधिका-यांना निवेदन दिले.

कुरबानी शांती आणि एकतेचा संदेश देणारा मोहरम चंद्रपूरात हिंदु - मुस्लिम बांधव मोठया एकोप्याने दर वर्षी मनवतात हेच या सनाचे वैशिष्ट्य असून यानिमीत्य चंद्रपूरात बाहेरुन येणा-या भक्तांच्या सेवेसाठी अणेक ठिकाणी शरबत वितरणासह विविध आयोजन करण्यात आले आहे हिंदू - मुस्लिम बांधवांनी संयूक्तरित्या केलेल्या याच  आयोजनांमुळे भक्तांच्या उत्साहात भर घालण्याचे काम केले असून असे आयोजनच हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक असल्याचे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणपती बाप्पाला साखळे घालत भाजप सरकारला सतबुध्दी दे अशी प्रार्थणा करण्यात आली. यावेळी  नवनिर्माण गणेश मंडळ चिंचाळा येथे सतबुद्धि यज्ञ सुध्दा करण्यात आले. भाजप सरकार मधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र शब्द बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत, निवडणूक दरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले त्याची पूर्तता अदयापही करण्यात आलेली नाही. त्याच्याच निषेधार्थ  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सतबुद्धि यज्ञ करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा भाजप सरकार ला सतबुद्धि प्रदान करो, अशी प्रार्थना करत जनतेच्या हिताचे चांगले कार्य या सरकारच्या हातून घडेल अशी बुद्धी सरकारला दे अशी मागणी मनसे                    ने गणेशाकडे केली,              नोटबंदी सारख्या चुकीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे, तर दूसरीकडे पेट्रोल,डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढीमूळे सर्वसामान्यांचा बजेट कोलमडला आहे. बेरोजगारी, शेतकर्यांप्रति उदासीन धोरण, अश्या अनेक बाबी घेऊन हे सतबुद्धि यज्ञ करण्यात आले सदर सतबुद्धि यज्ञ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर,तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहरअध्यक्ष मनदीप रोडे,वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर,जिल्हा उपाध्यक्ष महिलासेना माया मेश्राम,शहर अध्यक्ष महिलासेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे,तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे,तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार,शहर उपाध्यक्ष महेश वासलवार,तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर,शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करणं नायर,शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर,चौतन्य सदाफळे,कैलास खुजे,किरण रामेडवार,सतीश वाकडे, सुनील खामनकर,अर्चना आमटे,ऋषीकेश बालमवार आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

 

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन सध्या चंद्रपूरातील राजीकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमदार साहेब या मथळयाखाली टाकलेल्या या पोस्टमध्ये आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉ. जावयाला आवरा असा उल्लेख करण्यात आला आहे. विषेश म्हणजे यात आमदार किंव्हा डॉक्टरच्या नावाला उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सारेच आप-आपला अंदाज बांधत आहे.

चंद्रपूर: 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्हîतील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

2104 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवून 51 हजार मत घेत सर्व राजकीय पक्षांना धक्का देणा-या किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय  वर्तुळात खळबळ माजली आहे. किशोर जोरगेवार हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा रंगल्या आहे.

रुपेश कोकावार - विकास कामांना गती देत विकास पूरुष अशी स्वताची ओळख तयार करणा-या ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमीत्य आज शुभेच्छा संदेशाने सोशल मिडीया हाऊसफुल झाल्याचे चित्र होते. एकंदरीतच आज दिवसभर सोशल नेटवर्किंग साईटवर सुधिर मुनगंटीवारांचाच राज दिसून आला.

 

४८ तास पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. या अंदाजा नुसार गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार सुरु आहे. त्यामुळे ठीकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील अणेक रस्ते सुद्धा बंद झाले आहे. त्यामूळे याचा मोठा त्रास विदयार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता उदया सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.

रूपेश कोकावार - मागील 20 तासांपासून शासकीय वैदयकीय महाविद्यालयातील विद्युत पुरवठा खंडित असून अतिदक्षता विभागातील सेवाही ठप्प पडली आहे. त्यामुळे रुग्णाची चांगलीच ग़ैरसोय होत असून. रुग्णाच्या जीवाचा खेळ सुरु आहे.

पाँलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि  बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Page 1 of 2