चंद्रपुरातील चांदा फोर्ट आणि मूल रेल्वे स्थानक उडवण्याच्या मिळालेल्या नक्सली पत्रानंतर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. आज चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर पोलिस विभाग आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त रित्या मॉक ड्रिल ( पुर्व सराव ) करत प्रत्येक अनुचित प्रकाराला हाणून पाडण्यासाठी आम्ही पूर्णतः तयार आहो हे दाखवून दिले आहे. यात चंद्रपूर पोलीस, श्वान पथक, बॉम्ब डिस्पोजल पथक, रेल्वे पोलीस, आरपीएफ, क्यूआआरटी पथक सहभागी झाले होते.

चंद्रपूर - नागभीड रेल्वेस्थानकावर रेल्वे स्थानक उडविण्याच्या धमकीचे नक्सलवाद्यांचे पत्र मिळाल्याचे रेल्वे प्रशासनासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर  रेल्वे पोलिसांसह पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून चांदा फोर्ट, मूल, नागभीड या सह इतर रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पत्र फक्त  दहशत पसरविण्यासाठी ठेवले कि हे नक्सल्यांचे पत्र आहे या दिशेने तपास सुरु आहे.

चंद्रपूर - घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत प्रकाश डवळे नामक इसमाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर शहरालगतच असलेल्या दाताडा गावात घडली. घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.

मनपा आयुक्त संजय काकडे आणि उपायुक्त विजय देऊळीकर यांची उघडी हगणदारी मुक्त शहराची संकल्पणा यशस्वी झाली असून मागील काहि महिण्यांपासून या बाबत त्यांनी राबविलेल्या मोहिमेला यश आले आहे. चंद्रपूर शहर ओडीएफ (उघडी हगणदारी मुक्त)  झाला असल्याची घोषणा केंद्राकडुन करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसापासुन जलनगर येथे सुरु असलेल्या दोन गटाच्या वादतुन एकाचा बळी गेला आहे. नर्सिमा रंगोप्पा चट्टे असे मृतकाचे नाव असून तो जलनगर येथील रहिवासी होता. आज काही ईसम जलनगर निवासी नर्सिमा चट्टे याच्या घरी पोहचले व नर्सिमला मारहाण सुरु केली या मारहानित नर्सिमा बेशुद्ध झाला. त्याला उपचारा कारित जिल्हा सामान्य रुग्णालयात आनले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी काही आरोपीना अटक केली असल्याची माहिती असून दोन दिवसांपासुन जलनगर येथे सुरु असलेल्या वादतुन हे प्रकरण घडले असल्याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे.

चंद्रपूर - मध्यरात्री घरफोड्या करणाऱ्या बंटी - बबली च्या जोडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या जवळून चोरीतील जवळपास सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात  आले आहे. हाजी अब्दुल सुभान खान असे या बंटी चे नाव असून आशा भीमराव गवई या घरफोरट्या बबली चे नाव आहे. या दोघांवरही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 

चंद्रपूर - शहरातील फुटपाथ फक्त पायदळ स्वारांसाठीच आरक्षित राहील, असे स्पष्ट संकेत देत महानगर पालिका आयुक्त संजय काकडे यांनी फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्याची मोहीम सुरु केली आहे. अश्या अतिक्रमण धारकांवर आजवर इतकी मोठी कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे या व्यावसायिकांनी फुटपाथ गिळायला सुरुवात केली होती. मात्र मनपा आयुक्तांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर या अतिक्रमण धारक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यातील अनेक व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याचे हि बोलल्या जात आहे. असे असतानाही मनपा आयुक्तांनी राबविलेली हि मोहीम कौतुकास्पद आहे.

चंद्रपूर -  ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा सध्या चर्चेत असून काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरोरा येथील एका पेट्रोल पंपाची पुणे येथील गुन्हे शाखेच्या चमूने तपासणी केली. पेट्रोल कमी मिळत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी येत असल्या तरी एकदा वाहनात टाकलेले पेट्रोल, डिझेल मोजता येत नसल्याने तक्रार करण्यास अनेकांची अडचण होत आहे.

चंद्रपूर -  आदिवासी समाजातील समस्यांना वाचा फोडून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मात्र या योजनेतून चंद्रपूरला वगळण्यात आल्यामुळे जिल्हातील आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित आहेत. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी डी. के. आरीकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना निवेदन देण्यात आले आहे. 

चंद्रपुरातील सिस्टर कॉलोनी येथील अपार्टमेंट मध्ये सुरु असलेल्या देह व्यवसायाचा रामनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी हा व्यवसाय चालवणारी राणी मेश्राम हिला अटक करण्यात आली आहे.तर या देह व्यवसायात अडकलेल्या ३ मुलींना अल्पवयीन असल्याने सध्या सोडण्यात आले आहे.या घटनेनंतर चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे.

Page 2 of 3