संपुर्ण शहर गाढ झोपेत असतांना उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत ट्रक मधुन विदेशी कंपणीच्या 500 च्या जवळपास दारुच्या पेट्या जप्त केल्या आहें. या प्रकरणी ट्रक चालकांला अटक करण्यात आली असुन सदर ट्रक नागालँड राज्यातील आहे. हे वाहण सीमा पार करत महाराष्ट्रात कसे आले याचा तपास पोलिस करित असुन वाहणासह दारुची किंमत एक करोड रुपयांच्यावर असल्याची माहिती आहे.  आजवर करण्यात आलेल्या कारवायांपैकी ही कारवायी सर्वात मोठी असल्याचे बोलल्या जात आहे.

मेष राशी भविष्य (Wednesday, August 09, 2017)
आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल - तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.

आजचा दिवस

आरोग्य: 
धन: 
परिवार: 
प्रेम विषयक: 
व्यवसाय: 
वैवाहिक जीवन: 
वृषभ राशी भविष्य (Wednesday, August 09, 2017)
तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल - जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल.

आजचा दिवस

आरोग्य: 
धन: 
परिवार: 
प्रेम विषयक: 
व्यवसाय: 
वैवाहिक जीवन: 
 
 
 
मिथुन राशी भविष्य (Wednesday, August 09, 2017)
आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल - परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.

आजचा दिवस

आरोग्य: 
धन: 
परिवार: 
प्रेम विषयक: 
व्यवसाय: 
वैवाहिक जीवन: 

 

 
 
कर्क राशी भविष्य (Wednesday, August 09, 2017)
आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील - कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल.

आजचा दिवस

आरोग्य: 
धन: 
परिवार: 
प्रेम विषयक: 
व्यवसाय: 
वैवाहिक जीवन: 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २०१३ साली झालेल्या पदभरती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे , विद्यमान संचालक, तत्कालीन बँक सीईओ ,  एमकेसीएल कर्मचारी अशा एकूण ११ जणांवर एसीबीने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे . १८ नियुक्त उमेदवारांचे गुण आर्थिक व्यवहारानंतर वाढविल्याचा आरोप आहे, या कारवाई नंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रतिनीधी गोंडपीपरी -                                                                                                                                                                                                                                                    शहरी भागासह ग्रामीण भागातही दारु तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे आज गोंडपीपरी पोलीसांनी जोगापुर गावातील एका घरावर धाड टाकुन  तब्बल 144 पेट्या, विदेशी कंपणीची दारु जप्त केली या प्रकरणी एका महीलेला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 

रुपेश कोकावार - 

रात्री दरम्यान पोलिसांच्या गल्लीबोळातील गस्तीसाठी पोलीस अधीक्षकांनी सायकल गस्त हि संकल्पना आखली असून या संकल्पनेच्या चाचपणीसाठी शहर पोलीस ठाण्यात २ सायकली देण्यात आल्या आहे. पोलीसकर्मीहि प्रामाणिकपणे सायकल ने गस्त घालत आहे. मात्र आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे या गस्तीत अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे हि संकल्पना अमलात येण्या अगोदरच तिला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचे ग्रहण लागले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामधील सावंगी दीक्षित या गावात मागील ५ दिवसापासून पिवळा पाऊस पडत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. याचे नमुने ही गावातील झाडांच्या पानावर,घराच्या छतांवर पिवळ्या ठिपक्याच्या रूपात दिसून येत आहे. हे पावसाच्या पाण्यामुळे पडलेले ठिपके आहेत कि नाही या बाबत प्रशासनात संभ्रम आहे. येथील पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून हा नेमका काय प्रकार आहे. या बाबत तहसीलदारांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र सुरु असल्येल्या निसर्गाच्या या प्रकारामुळे गावकरी भयभीत आहे.

चंद्रपूर- फुटपाथवरील  फेरीवाल्या महिला आणि चिमुकल्यांना मोकाट जनावरे नेण्याच्या वाहनात ठासून भरत रामनगर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देण्याचा संताप जनक  प्रकार चंद्रपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार  फेरीवाले या वाहनात बसवल्यानंतर वाहनाला ताला लावण्याचा पराक्रमही पथकाने केला.

चंद्रपूर- फुटपाथवरील  फेरीवाल्या महिला आणि चिमुकल्यांना मोकाट जनावरे नेण्याच्या वाहनात ठासून भरत रामनगर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देण्याचा संताप जनक  प्रकार चंद्रपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार  फेरीवाले या वाहनात बसवल्यानंतर वाहनाला ताला लावण्याचा पराक्रमही पथकाने केला.

Page 1 of 5