खर्रा घेण्यासाठी पानटपरीवर  उभ्या असलेल्या 24 वर्षीय युवकावर पानटपरीला लागुन असलेली सुरक्षा भिंत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटणा आज प्रियदर्शनी चौकात सकाळच्या सुमारास घडली.  कैलास डोंगी असे या अपघातातील मृत तरुणाचे  नाव आहे.

दुचाकी वाहण चोरी करत असतांना सिसिटिव्हीत कैद झालेल्या वाहण चोरट्यांना शहर पोलिस ठाण्यातील शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या जवळून चोरीतील तीन दुचाकी वाहणे हस्तगत करण्यात आली आहे. भारत चंद्रशेखर मल्लीक आणि शेख नजिम उर्फ भूरा लतिफ असे या आरोपींचे नावे आहेत. भारत हा पंचशिल चैकातील रहिवासी असून लतिफ हा रयमत नगर येथिल रहिवासी आहे. 

चंद्रपूर शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याकरिता अर्थ नियोजन तथा वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी मोठा निधी चंद्रपूर शहराला दिला आहे. त्यातून विकास कामेही केल्या जात आहे. असे असले तरी आज घडीला स्वखर्चातून रस्त्यावरचे खड्डे भरण्याची वेळ महानगर पालिकेतील सत्ताधारी नगर सेवकांवरच आली असल्याचे चित्र तुकुम प्रभागातील प्रकार पहाता दिसून येत आहे. या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी चार वेळा निवेदन देवून सुध्दा त्यांच्या प्रभागातील रोडचे काम करण्यात येत नसल्याने त्यांनी स्वताच स्वखर्चातून रस्त्यावरचे खड्डे भरायला सुरुवात केली आहे. यात सत्वाचा मारोती ते वाघोबा चौक या रोडवरील खड्डे सिमेंट आणि काँक्रेट ने भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीयांवर राज्यात अन्याय होत आहे. जात तपासणीच्या नावाखाली आदिवासी विभाग व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती बेकादेशिर भूमिका घेऊन जात व वैधता प्रमाणपत्र नाकारत आहे. त्यामुळे समाजबांधवांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून हा अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृती समिती, नागपूर शाखा चंद्रपूरतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

जर आज कोणाचे २१ हजार रस्त्यावर पडले असेल तर त्या व्यक्तीने चिंतीत होण्याची गरज नाही,कारण त्यांचे हे २१ हजार रुपये जटपुरा गेट मार्गावर एका प्रामाणिक आटो चालकाच्या हाती लागले आहे.त्याने हि पूर्ण रक्कम रामनगर पोलीस ठाण्यात जमा केली आहे.

चंद्रपूरातील  गणेश  उत्सव डिजेच्या कर्कश आवाजा विना साजरा करण्यात यावा असे सांगत गणेश  उत्सावादाम्याण डिजेवर बंदि घालण्यात आल्याचा आदेश  पोलीस अधिक्षक नियती ठाकेर यांनी दिल्या नंतर या निर्णयाविरोधात आज डिजे व्यावसाईकांनी निषेध मोर्चा काढला या निर्णयामुळे शहरातील 350 डिजे व्यावसाईकांसह डिजे साउंड सिस्टम मध्ये काम करणा-या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढावणार असे ही या मोर्चाच्या माध्यमातुन डिजे व्यावसाईकांनी सांगीतले आहे.

फुटपाथ  वर अतिक्रमण करणा-या व्यावसाईकाविरोधात महानगर पालिकेने आपली मोहिम गतिशील केली असुन अश्या अतिक्रमण धारकांचे फुटपाथ वरिल साहित्य जप्त करण्यासह त्यांच्यावर गुन्हे ही दाखल करण्यात येणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त संजय काकडे यांनी दिला आहे

 राज्यात केवळ चंद्रपूरमध्ये सुरु झालेल्या ‘हॅलो चांदा’ पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेवर दूरध्वनी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणावरुन दूरध्वनी व्यस्त असल्यामुळे तक्रार दाखल न करता आल्याची नागरिकांची तक्रार आहे. तथापी एकाचवेळी अनेक फोन येत असल्यामुळे व्यस्तता येत असून नागरिकांनी ही तांत्रिक बाब समजून या यंत्रणेचा फायदा घेणे सुरु ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चंद्रपूर -   मांडीचं हाड तुटल्यानंतर मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असताना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयानं एका १२ वर्षीय मुलीला २५ दिवस ताटकळत ठेवल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. शेवटी शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन अधिका-यांना धारेवर धरले. त्यानंतर शस्त्रक्रियेची हमी देण्यात आली. या घटनेमुळं शासकीय वैद्यकीय सेवेचा चेहराही समोर आलाय.