नागालँड राज्यातील ट्रक मधुन 75 लाखांची विदेशी दारु जप्त - उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई Featured

Wednesday, 09 August 2017 10:51 Written by  Published in चंद्रपूर Read 339 times

संपुर्ण शहर गाढ झोपेत असतांना उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत ट्रक मधुन विदेशी कंपणीच्या 500 च्या जवळपास दारुच्या पेट्या जप्त केल्या आहें. या प्रकरणी ट्रक चालकांला अटक करण्यात आली असुन सदर ट्रक नागालँड राज्यातील आहे. हे वाहण सीमा पार करत महाराष्ट्रात कसे आले याचा तपास पोलिस करित असुन वाहणासह दारुची किंमत एक करोड रुपयांच्यावर असल्याची माहिती आहे.  आजवर करण्यात आलेल्या कारवायांपैकी ही कारवायी सर्वात मोठी असल्याचे बोलल्या जात आहे.

                                                                                        पोळा आणि गणेश उत्सव तोंडावर आहे. या उत्सवा दरम्याण मोठ्या प्रमाणात दारु विक्री होत असते. त्यासाठी दारु तस्कारांनी मोठ्या प्रमाणात दारु साठा साठवायला सुरुवात केली आहे. मात्र पोलिस विभागानेही दारु तस्कारांचे कंबरडे मोडण्यासाठी दारु विरोधी मोहिमा गतिशिल केल्या आहे. यात उपविभागीय पोलिस अधिका-यांचे विशेष पथक अग्रस्थानी आहे. काहि दिवसांअगोदरच मिनीडोरमध्ये विशेष खाच्या करुन दारुची वाहतुक करणा-या शक्कलबाज दारु तस्करांना जेलची हवा दाखवल्या नंतर या पथकाने आज मध्यरात्री धडाकेबाज कारवाई करत मामला जंगल परिसरातून चिल्लर तथा ठोक व्यापा-यांना दारु पुरवीणारा विदेशी दारुच्या पेट्यांनी भरलेला ट्रक पकडला आहे. या कारवाईत जवळवास 500 पेठ्या विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. ट्रकसह या दारुची किंमत करोड रुपयांच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे सदर ट्रक हा नागालँड राज्यातील असल्याने पर राज्यातील रॅकेट चंद्रपुरात सक्रिय झाले आहे हे लक्षात येते. त्या दिशेने पोलिस तपास करित आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक नियती ठाकर, अप्पर पोलिस अधिक्षक हेमराज सिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. 

Last modified on Wednesday, 09 August 2017 11:28
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.