गोंडपीपरी - नव्या साहेबांच्या धडाकेबाज कारवाया - पुन्हा 10 लाखांची विदेशी दारु जप्त Featured

Tuesday, 08 August 2017 13:10 Written by  Published in चंद्रपूर Read 261 times

प्रतिनीधी गोंडपीपरी -                                                                                                                                                                                                                                                    शहरी भागासह ग्रामीण भागातही दारु तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे आज गोंडपीपरी पोलीसांनी जोगापुर गावातील एका घरावर धाड टाकुन  तब्बल 144 पेट्या, विदेशी कंपणीची दारु जप्त केली या प्रकरणी एका महीलेला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 

 चंद्रपुर शहर पोलीस ठाण्यात  कार्यरत असताना दारु तस्करांसाठी काळ ठरलेले सहायक पोलिस निरिक्षक प्रविण बोरकुटे हे महिणाभरापुर्वीच गोंडपीपरी पोलिस ठाण्यात रुजु झाले आहे. सध्या त्यांच्यावर प्रभारी अधिकारी म्हणुन गोंडपिपरी पोलिस ठाण्याची जवाबदारी आहे. त्यांनी गोंडपीपरी तालुक्यात दारु विरोधी मोहिमा राबवायला सुरुवात केली असुन जेमथेम एक महिण्याच्या कार्यकाळातच त्यांनी जवळपास दारुविरोधी 30 कारवाया केल्या आहे. त्यात तब्बल 25 ते 30 आरोपींना अटक करण्यात आली आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                 

 चंद्रपुर जिल्हात दारु तस्करीचे प्रमाण मागील काही महिण्यांपासुन थंडावल्या सारखे वाटत होते. मात्र पोळा  सणाची पार्शवभूमी लक्षात घेता दारु तस्कर पुन्हा एॅक्टीव झाले असल्याचे दिसुन येत आहे. मात्र पोलिसांनीही हे सर्व उत्सव दारूमुक्त वातावरणात शांतमय पध्दतीने पार पडावे या करीता कमर कसली असून दारु विरोधी मोहिमा गतीशिल केल्या आहे. गोंडपीपरी पोलिस ठाण्यात जेमथेम एक महिणा अगोदरच रुजु झालेले प्रविन बोरकुटे हे सध्या प्रभारी पोलिस अधिकारी म्हणुन गोंडपीपरी पोलिस ठाणा सांभाळत आहेत. मात्र एक महिण्यातच त्यांनी दारु तस्करांना पिंजूुन काढायला सुरुवात केली आहे. त्यांनी गोंडपीपरी तालुक्यात सूरु केलेल्या दारु विरोधी मोहिमेंमुळे दारु तस्कारांचे धाबे दणानले आहे. एक महीण्याच्या अल्पश्या कार्यकाळात त्यांनी जवळपास दारु विरोधी 30  कारवाया केल्या आहे. त्यात तब्बल 25 ते 30 आरोंपीना अटक करण्यात आली आहे. दरम्याण काल रात्री त्यांनी आणखी एक दारु विरोधी मोठी कारवाई केली असुन यात 10 लाख 80 हजार रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. जोगापुर गावातील धाब्या जवळ असलेल्या एका घरातुन ही दारु जप्त करण्यात आली असुन नव्या साहेबांच्या अश्या धडाकेबाज कारवायांच्या सत्रा मुळे दारु तस्कर चांगलेच भयभित झाले आहे. या अगोदरही चंद्रपुरातील शहर पोलिस ठाण्यात काम करतांना ठाणेरांच्या गैरहजरीत ठाणा सांभाळण्याचा मोठा अनुभव त्यांच्या जवळ आहे हे विशेष.

 

 

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.