पोलीस अधीक्षकांच्या सायकल गस्त संकल्पनेला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचे ग्रहण - पोलीस दादा अडचणीत Featured

Monday, 07 August 2017 13:39 Written by  Published in चंद्रपूर Read 251 times

रुपेश कोकावार - 

रात्री दरम्यान पोलिसांच्या गल्लीबोळातील गस्तीसाठी पोलीस अधीक्षकांनी सायकल गस्त हि संकल्पना आखली असून या संकल्पनेच्या चाचपणीसाठी शहर पोलीस ठाण्यात २ सायकली देण्यात आल्या आहे. पोलीसकर्मीहि प्रामाणिकपणे सायकल ने गस्त घालत आहे. मात्र आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे या गस्तीत अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे हि संकल्पना अमलात येण्या अगोदरच तिला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचे ग्रहण लागले आहे. 

 

                                                                                                                                                                       पोलीसकर्मी रात्री गस्ती दरम्यान शहरातील गल्लीत फिरकत नाही अशी तक्रार नेहमीच नागरिकांची असते. तर शहरातील गल्ल्यांमधील रस्ते अरुंद असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन गल्लीबोळ्यात जाऊ शकत नाही हि पोलिसांची अडचण आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलिसांची सायकल गस्त हि संकल्पना पुढे आणली आहे. या संकल्पने अंतर्गत पोलीस कर्मचारी रात्री सायकलने गस्त घालत शहरातील गल्लोगल्ली पिंजून काढणार आहे. या संकल्पनेची चाचपणी करण्याकरिता प्रायोजित तत्वावर शहर ठाण्यात दोन सायकली देण्यात आल्या आहे. शहर ठाण्यातील पोलीस कर्मचारीहि या सायकलीने गस्त घालताना दिसून येत आहे. मात्र आता शहरातील मोकाट कुत्रे सायकलीच्या मागे धावत असल्याची बाब समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस मोकाट कुत्रे वाहनांच्या मागे धावणे हि बाब चंद्रपूर करांसाठी नवीन नाही. यातून आजवर अनेक अपघातही घडले आहे. मात्र सायकल चालकाच्या मागे कुत्रा लागल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. सध्या याच भययुक्त परिस्थितीतून रात्रीच्या वेळी सायकलने गस्त घालणाऱ्या पोलीस दादाला सामोरे जावे लागत आहे. मात्र पोलीस खात हे शिस्तीचं खात असल्याने या बाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली नाही. तर ते प्रामाणिकपणे सायकलने गस्त घालत आहे. असे असले तरी  सध्या स्थिती पाहता पोलीस अधीक्षकांच्या सायकल गस्त अभियानाला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचे ग्रहण लागलेय हि सत्यस्थिती आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात हे ग्रहण सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक काय उपाययोजना आखतात याकडे लक्ष राहणार आहे. तसेच महानगर पालिकेनेही मोकाट कुत्रांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.                                                                                                                  

Last modified on Monday, 07 August 2017 13:52
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.