सावली तालुक्यात पडला पिवळा पाऊस - पाण्याचे नमुने प्रशासनाने पाठविले तपासणी करिता Featured

Monday, 07 August 2017 11:14 Written by  Published in चंद्रपूर Read 266 times

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामधील सावंगी दीक्षित या गावात मागील ५ दिवसापासून पिवळा पाऊस पडत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. याचे नमुने ही गावातील झाडांच्या पानावर,घराच्या छतांवर पिवळ्या ठिपक्याच्या रूपात दिसून येत आहे. हे पावसाच्या पाण्यामुळे पडलेले ठिपके आहेत कि नाही या बाबत प्रशासनात संभ्रम आहे. येथील पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून हा नेमका काय प्रकार आहे. या बाबत तहसीलदारांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र सुरु असल्येल्या निसर्गाच्या या प्रकारामुळे गावकरी भयभीत आहे.

                                                                                                      

मागील ५ दिवसापासून सावली तालुक्यातील सावंगी दीक्षित या गावात पिवळा पाऊस पडत आहे. पहिल्या दिवशी गावकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र आणखी सतत ४ दिवस पिवळा पाऊस पडल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले आहे. याची दखल आता प्रशासनाने घेतली असून तहसीलदाराने येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी वेदशाळेत पाठविले आहे. तसेच गावकऱ्यांनी विहिरीचे पाणी पिऊ नये असा आदेशही जारी करण्यात आला आहे.                                                                                                                                                                                                                                              

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.