मोकाट जनावरे नेण्याऱ्या वाहनात फ़ेरीवाल्या महिला आणि मुलांना कोंडले - मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचा संताप जनक प्रकार

Wednesday, 02 August 2017 13:47 Written by  Published in चंद्रपूर Read 218 times

चंद्रपूर- फुटपाथवरील  फेरीवाल्या महिला आणि चिमुकल्यांना मोकाट जनावरे नेण्याच्या वाहनात ठासून भरत रामनगर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देण्याचा संताप जनक  प्रकार चंद्रपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार  फेरीवाले या वाहनात बसवल्यानंतर वाहनाला ताला लावण्याचा पराक्रमही पथकाने केला.

           शहरातील मोकाट जनावरांवर  नियंत्रण ठेवण्याकरिता मनपाने अर्थसंकल्पात तरतूद करत रस्त्यावरील जनावरे नेण्याकरिता वाहने खरेदी केलीत. या वाहनातून शहरातील मोकाट जनावरांना नेण्यात येते. विशेष म्हणजे यात मृत जनावरांसह बिमार जनावरांचा हि समावेश असतो. मात्र आता याच वाहनात फेरीवाल्यांना तुंबल्याचा पराक्रम झोन क्रमांक तीन मधील मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला आहे. सध्या शहरातील अतिक्रमण विरोधात मनपाच्या वतीने कारवाई केल्या जात आहे. याचे सर्वत्र कौतुक हि केल्या जात आहे. असेच अतिक्रमण हटविण्याकरिता मनपाचे अतिक्रमण पथक सावरकर चौकातील फुटबॉल ग्राऊंट येथे पोहचले. यावेळी येथे असलेल्या फेरीवाल्यांचा पथकांसोबत वाद झाला. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने या फेरीवाल्यांना मोकाट जनावर नियंत्रण वाहनात तुंबले  व वाहनाला ताला लावून रामनगर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिली. मात्र मनपा आयुतांनी येथील  फेरीवाल्यांना एक महिन्याची मुद्दत  वाढ दिल्याने नंतर त्यांना सोडून देण्यात आले. परंतु मोकाट जनावरे नेण्याच्या वाहनात महिलांना आणि चिमुकल्या मुलांना कोंडल्याने या कारवाई विरोधात संताप व्यक्त होत आहे. 

                              " हे वाहन फक्त मोकाट जनावरे नेण्याकरिता नाही. अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याकरिताही या वाहनाचा वापर केल्या जात आहे. आम्ही कोणाला या वाहनात बसविले नाही तर फेरीवाले स्वतः वाहनात बसले '' अशी माहिती चांदा मिररशी बोलताना अतिक्रमण विरोधी पथकातील प्रमुख नामदेव राऊत यांनी दिली आहे.

                                                                                        --  नामदेव राऊत - अतिक्रमण पथक प्रमुख

Last modified on Wednesday, 02 August 2017 16:10
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.