पिकअप वाहनाची दुचाकीला धडक, तीन विद्यार्थी जखमी - एकाची प्रकृती गंभीर Featured

Wednesday, 02 August 2017 11:10 Written by  Published in चंद्रपूर Read 280 times

दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या अपघातात ३ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान विद्या निकेतन समोर घडली. यातील एक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

चंद्रपूर नागपूर मार्गाचे काम सुरु असल्यामुळे येथील वाहतूक एकतर्फा करण्यात आली आहे. आज सकाळच्या दरम्यान विद्या निकेतन येथील ३ विद्यार्थी मोपेड या दुचाकी वाहनावर शाळेतून घरी परतत होते. याच दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या त्यांच्या दुचाकी वाहनाला पिकअप वाहनाने समोरासमोर धडक दिली. या अपघातात हे तीनही  विद्यार्थी जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे.                                                                                                                                                                                                                   

Last modified on Wednesday, 02 August 2017 16:06
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.