आम्ही तैयार आहोत - मॉक ड्रिल करून पोलिसांचे प्रतिउत्तर Featured

Saturday, 29 July 2017 11:46 Written by  Published in चंद्रपूर Read 328 times

चंद्रपुरातील चांदा फोर्ट आणि मूल रेल्वे स्थानक उडवण्याच्या मिळालेल्या नक्सली पत्रानंतर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. आज चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर पोलिस विभाग आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त रित्या मॉक ड्रिल ( पुर्व सराव ) करत प्रत्येक अनुचित प्रकाराला हाणून पाडण्यासाठी आम्ही पूर्णतः तयार आहो हे दाखवून दिले आहे. यात चंद्रपूर पोलीस, श्वान पथक, बॉम्ब डिस्पोजल पथक, रेल्वे पोलीस, आरपीएफ, क्यूआआरटी पथक सहभागी झाले होते.

 

                                                                 

रेल्वे स्थानक उडवण्याच्या धमकीचे पत्र मिळताच पोलिस विभागकडून चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन परिसरात वर्षभरात कधी न झालेली पोलिसांची मॉकड्रिल  म्हणजेच कोणताही अनुचित प्रकार घड़तांना कसा रोकावा यासाठीचा सराव घेण्यात आला. यात रेल्वे पोलिसही सहभागी झाले होते.

                                                               

शुक्रवारी नक्षलवाद्यांकड़ून रेल्वेस्टेशन उडवून देण्याची बातमी शहरभर पसरताच चांगलीच खळबळ उडाली. त्यातच कालपासून नक्सली सप्ताह सुरु झाल्याने पोलीस अलर्ट आहे. नागभीड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना एक पत्र मिळाले आहे. त्यात  चंद्रपूरातील  चांदा फोर्ट आणि मूल रेल्वे  स्थानक उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे असा प्रकार घडल्यास पोलीस विभाग किती सतर्क आहे याची तपासणी आज पोलिसांनी चांदा फोर्ट येथे मॉकड्रिल करत केली. अर्धा तास चाललेल्या या मॉकड्रिल मध्ये रेल्वे स्टेशन परिसर सर्च करण्यात आले. सर्चिंग दरम्यान पोलीस विभागाकडूनच ठेवण्यात आलेला स्फोटक  श्वान पथकाने शोधून काढला. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजर टीम ने स्फोटक डिस्पोज केला अश्या प्रकारे हि मॉकड्रिल यशस्वी करण्यात आली. पोलिसांची सक्रियता व तत्परता तपासण्यासाठी  हि मॉकड्रिल  करण्यात आली असे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले. 

Last modified on Saturday, 29 July 2017 11:56
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.