चांदा फोर्ट आणि मुल रेल्वेस्थानक उडविण्याची नक्सलवाद्यांकडून धमकी - पोलीस विभागात खळबळ - रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढला Featured

Friday, 28 July 2017 13:52 Written by  Published in चंद्रपूर Read 3399 times

चंद्रपूर - नागभीड रेल्वेस्थानकावर रेल्वे स्थानक उडविण्याच्या धमकीचे नक्सलवाद्यांचे पत्र मिळाल्याचे रेल्वे प्रशासनासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर  रेल्वे पोलिसांसह पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून चांदा फोर्ट, मूल, नागभीड या सह इतर रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पत्र फक्त  दहशत पसरविण्यासाठी ठेवले कि हे नक्सल्यांचे पत्र आहे या दिशेने तपास सुरु आहे.

 तीन दिवसापूर्वी नागभीड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना एक लिफाफा मिळाला. या लिफाफ्यात एक पत्र आढळले. या पत्रावरती नक्सलवाद सप्ताह दिवस असे लिहिले असून  'मी नक्सलवादी बोलतो आम्ही रेवलेस्टेशन चांदा फोर्ट उडवून देणार आहोत नाही तर मूल रेल्वे स्टेशन विस्फोट करणार आहोत' असे  लिहिण्यात आहे. या पत्रानंतर रेल्वे पोलिसांसह पोलीस विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आणि मूल रेल्वे स्टेशनवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच १० ते १५ पोलिसकर्मी रेल्वेत तैनात करण्यात आले असल्याची माहिती आहे. हे पत्र फक्त दहशत पसरविण्यासाठी ठेवण्यात आले आहे कि, नक्सल्यांकडून करण्यात आलेलं हे कृत्य आहे. या दिशेने पोलीस विभागासह रेल्वे पोलीस तपास करत आहे. या बाबत  पोलिसांनीही दुजोरा दिला असून  संपूर्ण प्रकारावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Last modified on Friday, 28 July 2017 14:04
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.