घरगुती वादातून हत्या - दाताळा गावातील घटना Featured

Thursday, 27 July 2017 15:44 Written by  Published in चंद्रपूर Read 634 times

चंद्रपूर - घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत प्रकाश डवळे नामक इसमाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर शहरालगतच असलेल्या दाताडा गावात घडली. घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.

दाताडा गावातील रहिवाशी असलेला प्रकाश डवळे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. तो दारूच्या आहारी गेला होता नेहमी दारूच्या नशेत घरी वाद घालत असे दरम्यान आजही त्याने दारूच्या नशेत घरच्यांशी वाद घातला मात्र यावेळी घरच्या मंडळींनी त्याला विरोध केला व नातलगांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत प्रकाश याचा जागीच मृत्यू झाला आहे . पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.