मनपा आयूक्तांच्या संकल्पनेतुन चंद्रपुर शहर ओडिफ (उघडी हगणदारी मुक्त) - केंद्राची घोषणा Featured

Wednesday, 26 July 2017 14:28 Written by  Published in चंद्रपूर Read 359 times

मनपा आयुक्त संजय काकडे आणि उपायुक्त विजय देऊळीकर यांची उघडी हगणदारी मुक्त शहराची संकल्पणा यशस्वी झाली असून मागील काहि महिण्यांपासून या बाबत त्यांनी राबविलेल्या मोहिमेला यश आले आहे. चंद्रपूर शहर ओडीएफ (उघडी हगणदारी मुक्त)  झाला असल्याची घोषणा केंद्राकडुन करण्यात आली आहे.

                        शहर उघड्यावरची हगणादारी मुक्त करण्याकरीता चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त संजय काकडे आणि उपायुक्त विजय देऊळीकर यांनी शहरात मोहिम राबवली होती. त्या अनुषंगाने नव्याने शौचालयाचे बांधकाम करने, बंद अवस्थेत असलेले शौचालय सुरु करने तसेच उघड्यावरती शौचालयास जात असणा-यांवर कारवाया करत त्यांच्यात जनजागृती करण्याचे काम केल्या गेले होते. या बाबतचा केंद्र शासणाच्या एका टिमने शहरात सर्वे केला आणि त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला. त्यानंतर आज चंद्रपुर शहर ओडिफ (उघडी हगणदारी मुक्त)  झाला असल्याची  पावती केंद्राकडून देण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिकेच्या गौरवात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.