रात्री घरफोड्या करणारी बंटी - बबली ची जोडी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात - अनेक घरफोड्यांचा खुलासा - सात तोळे सोने हस्तगत Featured

Tuesday, 25 July 2017 10:58 Written by  Published in चंद्रपूर Read 336 times
चंद्रपूर - मध्यरात्री घरफोड्या करणाऱ्या बंटी - बबली च्या जोडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या जवळून चोरीतील जवळपास सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात  आले आहे. हाजी अब्दुल सुभान खान असे या बंटी चे नाव असून आशा भीमराव गवई या घरफोरट्या बबली चे नाव आहे. या दोघांवरही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 
 
               बंटी आणि बबली हि जोडी अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या बंटी ओर बबली या सिनेमातून प्रसिद्ध झाली.  चंद्रपूरातही अशीच एक जोडी मागील अनेक वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय झाली होती. त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलीस विभागासमोर होते. अनेकदा हि जोडी पोलीस पोहोचताच घटनास्थळावरून पसार व्हायची. अश्याच एक प्रकरणात राधाकृष्ण टॉकीज जवळील एका घरात चोरटे शिरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले मात्र तोवर हे चोरटे तेथून पसार झाले होते. मात्र प्रत्यक्ष दर्शींनी चोरट्यांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे सांगितले. तेव्हा पासून बंटी - बबली ची जोडी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला व पक्की खात्री होताच या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशा भीमराव गवई या ४० वर्षीय आणि हाजी अब्दुल सुभान खान या ३० वर्षीय आरोपींना अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर या  बंटी - बबली च्या जोडीने अनेक घरफोड्यांचा खुलासा केला आहे. या दोघांविरोधात बल्लारशा,रामनगर,कोठारी आणि राजुरा येथील पोलीस ठाण्यांमंध्ये गुन्हे नोंद आहे. या जोडीकडून आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.