फुटपाथ फक्त पायदळ स्वारांसाठीच, मनपा आयुक्तांचे स्पष्ट संकेत - फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त - शहरातील नागरिक पुन्हा चालतील फुटपाथवर Featured

Tuesday, 25 July 2017 10:26 Written by  Published in चंद्रपूर Read 349 times

चंद्रपूर - शहरातील फुटपाथ फक्त पायदळ स्वारांसाठीच आरक्षित राहील, असे स्पष्ट संकेत देत महानगर पालिका आयुक्त संजय काकडे यांनी फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्याची मोहीम सुरु केली आहे. अश्या अतिक्रमण धारकांवर आजवर इतकी मोठी कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे या व्यावसायिकांनी फुटपाथ गिळायला सुरुवात केली होती. मात्र मनपा आयुक्तांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर या अतिक्रमण धारक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यातील अनेक व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याचे हि बोलल्या जात आहे. असे असतानाही मनपा आयुक्तांनी राबविलेली हि मोहीम कौतुकास्पद आहे.

                                                 

चंद्रपूर शहरातील मार्गाची अरुंदी पाहता त्या तुलनेत वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मुख्य मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. हि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन तथा शासनातर्फे उपाययोजना आखण्यात येत आहे. असे असताना मात्र पायदळ स्वारांसाठी कोणतीही योजना दिसत नाही. त्यांच्यासाठी आरक्षित असणारे फुटपाथहि आता व्यापाऱ्यांनी गिळले आहे. या व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्यावर आजवर मोठी कारवाई झाली नसल्याची शहरात चर्चा आहे. असे असताना पायदळ स्वारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त संजय काकडे धावून आले आहेत.

   ते या अगोदर प्रमाणे  फक्त नोटीस बजावण्या पुरते सीमित राहले नसून त्यांनी कारवाया करायला सुरुवात केली आहे. या कारवाईचे स्वरूपही मोठे असून फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांची साधन सामुग्री मनपा दरवबारी जप्त केल्या जात आहे. यात फुटपाथवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या फ्रिज व इतर महागड्या सामुग्रीचा समावेश आहे. मनपा आयुक्त इथेच थांबले नसून या व्यावसायिकांना एका आठवड्याचे अल्टिमेशं देण्यात आले आहे. त्या नंतरही फुटपाथवर अतिक्रमण कायम राहिल्यास चक्क त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे. त्यामुळे पायदळस्वार नागरिक आता पुन्हा पुटपाथवरून सुरक्षित प्रवास करू शकणार आहे. 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.