जय चा बछडा श्रीनिवास आढळला मृतावस्थेत…

Monday, 01 July 2013 03:37 Written by  Published in Magazine Read 1653 times

आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला जय चा बछडा श्रीनिवास हा मागील काही दिवसांपासून लापता होता. श्रीनिवास ला लावण्यात आलेली कॉलर आय.डी. ही तुटलेल्या अवस्थेत मिळाली होती. त्यामुळे श्रीनिवासची शिकार झाली असावी अशी शंका वर्तविण्यात येत होती.

परंतु काल चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरापासून ५ किमी. अंतरावर वाघाचा मृतदेह आढळला. केलेल्या कारवाईत लक्षात आले की हा मृतदेह श्रीनिवासचाच असून त्याला पुरण्यात आले होते. म्हसली या गावातील शेतशिवारात पिकांचे रक्षण करण्यासाठी महादेव इरपाते या शेतक-याने कुंपणात वीजप्रवाह सोडला होता. याच विजेचा धक्का लागून वाघाचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात येऊ नये म्हणून शेतक-याने कॉलर आय.Jai Tiger son Shrinivas डी. फेकून देत मृत वाघाला जमीनित पुरले होते. संबंधित शेतकऱ्याला वनविभागाने अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Last modified on Saturday, 29 April 2017 20:07
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.