संपुर्ण शहर गाढ झोपेत असतांना उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत ट्रक मधुन विदेशी कंपणीच्या 500 च्या जवळपास दारुच्या पेट्या जप्त केल्या आहें. या प्रकरणी ट्रक चालकांला अटक करण्यात आली असुन सदर ट्रक नागालँड राज्यातील आहे. हे वाहण सीमा पार करत महाराष्ट्रात कसे आले याचा तपास पोलिस करित असुन वाहणासह दारुची किंमत एक करोड रुपयांच्यावर असल्याची माहिती आहे.  आजवर करण्यात आलेल्या कारवायांपैकी ही कारवायी सर्वात मोठी असल्याचे बोलल्या जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २०१३ साली झालेल्या पदभरती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे , विद्यमान संचालक, तत्कालीन बँक सीईओ ,  एमकेसीएल कर्मचारी अशा एकूण ११ जणांवर एसीबीने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे . १८ नियुक्त उमेदवारांचे गुण आर्थिक व्यवहारानंतर वाढविल्याचा आरोप आहे, या कारवाई नंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रतिनीधी गोंडपीपरी -                                                                                                                                                                                                                                                    शहरी भागासह ग्रामीण भागातही दारु तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे आज गोंडपीपरी पोलीसांनी जोगापुर गावातील एका घरावर धाड टाकुन  तब्बल 144 पेट्या, विदेशी कंपणीची दारु जप्त केली या प्रकरणी एका महीलेला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 

रुपेश कोकावार - 

रात्री दरम्यान पोलिसांच्या गल्लीबोळातील गस्तीसाठी पोलीस अधीक्षकांनी सायकल गस्त हि संकल्पना आखली असून या संकल्पनेच्या चाचपणीसाठी शहर पोलीस ठाण्यात २ सायकली देण्यात आल्या आहे. पोलीसकर्मीहि प्रामाणिकपणे सायकल ने गस्त घालत आहे. मात्र आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे या गस्तीत अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे हि संकल्पना अमलात येण्या अगोदरच तिला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचे ग्रहण लागले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामधील सावंगी दीक्षित या गावात मागील ५ दिवसापासून पिवळा पाऊस पडत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. याचे नमुने ही गावातील झाडांच्या पानावर,घराच्या छतांवर पिवळ्या ठिपक्याच्या रूपात दिसून येत आहे. हे पावसाच्या पाण्यामुळे पडलेले ठिपके आहेत कि नाही या बाबत प्रशासनात संभ्रम आहे. येथील पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून हा नेमका काय प्रकार आहे. या बाबत तहसीलदारांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र सुरु असल्येल्या निसर्गाच्या या प्रकारामुळे गावकरी भयभीत आहे.

चंद्रपूर- फुटपाथवरील  फेरीवाल्या महिला आणि चिमुकल्यांना मोकाट जनावरे नेण्याच्या वाहनात ठासून भरत रामनगर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देण्याचा संताप जनक  प्रकार चंद्रपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार  फेरीवाले या वाहनात बसवल्यानंतर वाहनाला ताला लावण्याचा पराक्रमही पथकाने केला.

चंद्रपूर- फुटपाथवरील  फेरीवाल्या महिला आणि चिमुकल्यांना मोकाट जनावरे नेण्याच्या वाहनात ठासून भरत रामनगर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देण्याचा संताप जनक  प्रकार चंद्रपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार  फेरीवाले या वाहनात बसवल्यानंतर वाहनाला ताला लावण्याचा पराक्रमही पथकाने केला.

दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या अपघातात ३ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान विद्या निकेतन समोर घडली. यातील एक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

रुपेश कोकावार -                                                                                                                                                                                                 रात्री गस्ती दरम्याण पोलिस गल्ली बोळ्यात गस्त घालत नाही असा आरोप नेहमीच पोलिस विभागावर स्थाणिकांकडून केला जात असतो. यावर तोडगा काढण्यासाठी तसेच पोलिसांना शारिरिक रित्या सुधृढ  ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांनी 'पोलिसांची सायकल गस्त' ही संकल्पणा आखली असून या संकल्पनेची चाचपणी करण्याकरीता शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दोन सायकल देण्यात आल्या आहे.  त्यामुळे नेहमी चारचाकी आणि दुचाकी वर दिसणारा 'पोलिस दादा' आता सायकलस्वारी करत गस्त घालतांना दिसुन येणार आहे. 

 रुपेश कोकावार - 

                       हत्याऱ्यासह चोरी करण्या करीता एपीजे अब्दुल कलाम बगिच्यात शिरलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी कर्तव्यावर असलेल्या चौकीदाराला बेदम मारहाण केल्याची घटणा काल रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. जखमी चौकीदाराला उपचारा करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोगली दुर्गंम असे चौकीदाराचे नाव आहे. विषेश म्हणजे 55 हेक्टर मध्ये बनलेल्या या  बगीच्याची सुरक्षा केवळ तीन गार्ड कडून केल्या जात आहे, त्यातही त्यांच्या कडे सुरक्षेचे काहीही साधन वन विभागाने दिलेले नाही.

Page 1 of 3