चंद्रपुरातील विजय हा जनतेचा आणि विकासाचा विजय- सुधीर मुनगंटीवार

Monday, 01 July 2013 03:34 Written by  Published in Magazine Read 1540 times

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा ईश्‍वराचा अंश असलेल्‍या जनतेचा विजय असुन या विजयाच्‍या मुळाशी कार्यकर्त्‍यांचे परिश्रम आहेत. चंद्रपूर शहरात भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आलेल्‍या अभूतपूर्व विकास कामांचा हा विजय आहे.

हा विजय आपण नम्रतेने स्विकारात असुन यापुढील काळात चंद्रपूर शहर राज्‍यातील प्रथम क्रमांकाचे शहर म्‍हणून विकसित करण्‍याचा संकल्‍प करीत असल्‍याचे प्रतिपादन वित्‍त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. शहरातील मतदारांचे त्‍यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने विकासाच्‍या मुददयावर लढविली. मतदारांसमोर केलेली विकासकामे ठेवून निवडणूक लढविली. नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला मतरूपी आशिर्वाद देत विकासाच्‍या बाजूने कौल दिला. मतदारांच्‍या प्रेमाला आणि विश्‍वासाला आम्‍ही कधिही उतराई होणार नाही. विजय झाला तर माजायचे नाही व पराभव झाला तर लाजायचे नाही या सुत्रानुसार आम्‍ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. शहरातील विकासकामांचा हा झंझावात आपण यापूढेही असाच पुढे नेणार असुन मतदारांनी दाखविलेल्‍या विश्‍वासाला आपण कधीही तडा जावू देणार नाही, असे ही वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Last modified on Saturday, 29 April 2017 20:12
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.